Ad will apear here
Next
बुद्ध धम्मामुळे परिवर्तन व जीवनाचे सोने झाले : प्रा. शुक्राचार्य गायकवाड


भिवंडी :
ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील गोरसई येथे ६३वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शुक्राचार्य गायकवाड, सणसवाडी (पुणे) येथील बुद्धिस्ट मूव्हमेंट सेंटरचे सुनील भवार, एस. बी. गायकवाड, बँक व्यवस्थापक शिवनाथ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गायकवाड या प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाच लाख नागरिकांना नागपूरच्या दीक्षाभूमीवर बुद्ध धम्माची दीक्षा दिली आणि २२ प्रतिज्ञा दिल्या. तो दिवस म्हणजे १४ ऑक्टोबर. १४ ऑक्टोबर १९५६ला आंबेडकरांनी सोन्यासारखा धम्म दिला आहे. त्याचे रक्षण करणे आपले काम आहे. त्याचा प्रचार, प्रसार करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कारण बुद्ध धम्मामुळे आपले परिवर्तन झाले असून, आपल्या जीवनाचे सोने झाले आहे,’ असे प्रा. शुक्राचार्य गायकवाड म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पँथर यशवंत गायकवाड यांनी केले. सुंदर रांगोळी रेखाटल्याबद्दल संतोष गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बौद्धाचार्य दत्तू गायकवाड, सरपंच आनंद गायकवाड, रामदास जाधव, नागेश गायकवाड, गणेश गायकवाड, मुकेश गायकवाड, उमेश गायकवाड, अरुण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. आभारप्रदर्शन सरपंच आनंद गायकवाड यांनी केले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZVSCF
Similar Posts
समतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा बोरीवली : १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या दिवसाचे औचित्य साधून ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील समतानगर, बोरिवली पडघा येथील समाज विकास मंडळ व समतानगर येथील ग्रामस्थांच्या वतीने ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन बुद्धविहाराच्या परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
डॉ. आंबेडकरांनी पडघा येथेही केला होता पाणी सत्याग्रह भिवंडी : ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील पडघा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली होती आणि तेथे पाणी सत्याग्रहही केला होता. त्या आठवणीला पडघ्यातील नागरिकांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त उजाळा दिला.
भिवंडीत फटाकेमुक्त दिवाळी अभियानाला सुरुवात भिवंडी : फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासंदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे भिवंडीतील शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा प्रधान सचिव गणेश शेलार यांनी भिवंडीतील रांजणोली, शिवनगर, चौधरपाडा, सावाद, मुठवल, सरवली या जिल्हा परिषद
पडघा केंद्राची मासिक शिक्षण परिषद उत्साहात भिवंडी : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या २०१५पासून सुरू केलेल्या उपक्रमांतर्गत शिक्षणात होणाऱ्या बदलांवर चिकित्सा व्हावी व शिक्षकांना योग्य माहिती मिळावी म्हणून भिवंडी तालुक्यातील पडघा शैक्षणिक केंद्राची मासिक शिक्षण परिषद पडघा-समतानगर बोरिवली जिल्हा परिषद मराठी शाळेत नुकतीच पार पाडली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language